महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस
हवामान विभागाच्या अहवालानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

यंदाच्या पावसाळी हंगामात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला असून शेतीसाठी ही बाब फायदेशीर ठरणार आहे.












