




बेळगावमध्ये उन्हाचा पारा चढला! बेळगाव शहरासह जिल्ह्यात तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा मिळत नाही.

बेळगाव : द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर व द मराठा लाइट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी स्टेडियम येथे त्रि-सेवा माजी सैनिक मेळावा व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला ५,२३० माजी सैनिक, वीर नारी, आश्रित व कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

छोट्या उद्योजकांना सुलभ कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारची नवी योजना जाहीर.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध राज्यांत लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्यात आली.

