मंगेश मोटर्सच्या चौथ्या पिढीचा ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा अध्याय!
देशपांडे कुटुंबाचा ऑटोमोबाईल व्यवसायाचा प्रवास श्री. जी. सी. देशपांडे यांनी क्रिसलर आणि जीएम मोटारींच्या आयातीपासून सुरू केला. त्यानंतर राजाभाऊ देशपांडे आणि त्यांच्या बंधूंनी लॅम्ब्रेटा स्कूटर, सुवेगा मोपेड आणि स्टँडर्ड मोटारींच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार केला.

बेळगाव : ऑटोमोबाईल क्षेत्रात चार पिढ्यांची परंपरा जपणाऱ्या बेळगावच्या मंगेश मोटर्सने आता मारुती सुझुकी अरेना या नव्या शोरूमच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार केला आहे. देवराज्य,खानापूर रोड, बेळगाव येथे सोमवार (दि. २ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता या शोरूमचे उद्घाटन पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला प्रख्यात उद्योगपती व ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर राम भंडारे तसेच आयआरसीटीसीच्या संचालक मंडळाचे स्वतंत्र संचालक डॉ. सचिन सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चार पिढ्यांचा विश्वासाचा प्रवास
१९९० मध्ये रोहित देशपांडे यांनी काइनेटिक होंडा दुचाकी व्यवसायाची धुरा सांभाळली. २००२ मध्ये मंगेश होंडा ही भारतातील पहिल्या टप्प्यातील होंडा दुचाकी विक्रेत्यांपैकी एक ठरली. यंदा बेळगावातील होंडा दुचाकी व्यवसायाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. २०१५ मध्ये होंडा कार्स व्यवसाय सुरू झाला आणि आता २०२६ मध्ये मारुती सुझुकी अरेना शोरूमच्या माध्यमातून व्यवसायात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. या चौथ्या पिढीच्या व्यवसायात कपिल देशपांडे सहभागी झाले आहेत.
साडेतीन दशकांत अडीच लाखांहून अधिक वाहनांची विक्री
गेल्या ३५ वर्षांत मंगेश मोटर्सच्या माध्यमातून बेळगाव आणि परिसरातील ग्राहकांना २ लाख ५० हजारांहून अधिक वाहनांची विक्री करण्यात आली आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून राष्ट्रीय बाजारपेठेत तिचा वाटा सुमारे ४२ टक्के आहे. नव्या शोरूममुळे मारुती सुझुकीच्या विविध मॉडेल्सची उपलब्धता बेळगावच्या ग्राहकांना अधिक सुलभ होणार आहे.
मंगेश मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित देशपांडे यांनी सांगितले की, चार दशकांपासून बेळगावकरांनी आमच्या कुटुंबावर विश्वास ठेवला आहे. पूर्वी वडिलांनी पेट्रोल पंपाची जबाबदारी दिल्यानंतर सुरू झालेला प्रवास आज मारुती सुझुकीच्या नव्या शोरूमपर्यंत पोहोचला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि उत्तम सेवा हीच आमची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
कपिल देशपांडे यांनीही चौथ्या पिढीत ही व्यावसायिक परंपरा पुढे नेण्याचा अभिमान व्यक्त केला. ऑटोमोबाईल व्यवसाय हा केवळ वाहनांपुरता मर्यादित नसून ग्राहकांशी निर्माण होणाऱ्या विश्वासाच्या नात्यावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या शोरूमच्या माध्यमातून बेळगावच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेला नवी चालना मिळण्यासह ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.











