अग्निवीरांसाठी दिलासादायक बातमी!
महाराष्ट्र पोलीस दलात २८२ माजी अग्निवीरांच्या नियुक्तीचा दावा

मुंबई : भारतीय नौदलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २८२ माजी अग्निवीरांना महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर नियुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे सैन्यसेवेनंतर रोजगाराच्या संधींची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न चर्चेत आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नियुक्त झालेल्यांमध्ये १५० जणांचा डेकसाइड, तर १३२ जणांचा इंजिनसाइड विभागातील अनुभव आहे. नौदलातील शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि प्रशिक्षणाचा उपयोग राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होऊ शकतो.















